तंत्रवेद - Smart Library संकल्पना

नमस्कार ! सार्वजनिक वाचनालय कल्याण च्या स्थापनेस २०१४ साली १५० वर्षे पूर्ण झाली. १५० वर्ष पूर्तीच्या निमित्ताने वाचनालयाचे संकेत स्थळ बनविण्याची संधी आम्हास मिळाली. वाचनालयाचे अध्यक्ष श्री. राजीव जोशी यांच्यासमवेत अनेक बाबींवर सविस्तर चर्चा झाली, त्यात वाचनालयासाठी उपयोगी ठरतील अशा अनेक गोष्टींचा विचार झाला.

कल्याण संकेतस्थळाच्या उद्घाटनानंतर सार्वजनिक वाचनालय नाशिक चे तत्कालीन कार्यवाह श्री. मिलिंद जहागीरदार यांना भेटलो. त्यांनी आम्हाला श्री. राजीव जोशी यांचा संपर्क क्रमांक विचारला आणि आम्हाला या उपक्रमाची कल्पना सुचली.

महाराष्ट्रात अनेक नामवंत वाचनालये आहेत, काही तर १००-१५० वर्षे जुनी आहेत. या सगळ्या वाचनालयांना एका छताखाली आणून एक सांस्कृतिक देवाण घेवाण सुरु केली तर काय हरकत आहे ? असं काहीतरी करायचं ठरल्यावर त्यादृष्टीने विचार करावयास सुरुवात केली. अनेक गोष्टी समोर येत गेल्या. त्या सर्व संकल्पना इथे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत.

समान शीले व्यसनेषु सख्यं या संस्कृत सुभाषिताप्रमाणे वाचनालयाशी संबधित व्यक्ती तसेच मराठी वाचक जर एकत्र आले तर निश्चितच काहीतरी चांगलं कार्य घडू शकेल असा आम्हास विश्वास वाटतो.

आजच्या संगणकयुगात दैनंदिन जीवनाचा वेग प्रचंड वाढला आहे. लहान मुलांची जी पिढी रात्री ९ वाजता दूरदर्शनवरील मालिका बघून आपला दिवस संपवीत असे ती पिढी आता पालकांच्या भूमिकेत शिरली आहे, आणि या पिढीतील प्रत्येक पालकास, कुठेतरी, आपलं मुल वाचन समृद्धीपासून लांब जातंय याची खंत आहे. नव्या पिढीला आपला सांस्कृतिक वारसा द्यायचा झाला तर तो त्यांना समजेल, रुचेल अशाच स्वरूपात द्यायला हवा. त्यासाठी हा प्रयत्न.

Smart Library हे app वाचनालयाचे आधुनिक प्रवेशद्वार आहे. Android च्या युगात वाचनालयाची माहिती, वाचनालयातील पुस्तके Smart Phone वर उपलब्ध करण्याचा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील नामांकित वाचनालये एका App मध्ये उपलब्ध आहेत. Smart Library या app मध्ये आपल्या वाचनालयाची नोंद असावी असे आपणांस नक्की जाणवेल. या App चे सभासद व्हायचे असल्यास शेजारी असलेला Form भरून तो Submit करा, आम्ही आपणापर्यंत पोहोचू.

आमचे सन्माननीय सभासद वाचनालये

स्मार्ट लायब्ररी सभासद नोंदणी
Smart Library

S. L. No
वाचनालय
नोंदणी क्र.
स्थापना वर्ष

पत्ता १
पत्ता २
विभाग
शहर

इमेल
संकेतस्थळ

दूरध्वनी १
दूरध्वनी २
भ्रमणध्वनी १
भ्रमणध्वनी २
संपर्क व्यक्ती

एकूण पुस्तके
एकूण सभासद
दर्जा (शासकीय)

अक्षांश
रेखांश

छायाचित्र